"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे , क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे " माझा कवितांसोबातच्या आठवणींचा प्रवास इथून सुरु होतो. बालपणीचे कित्येक " Family weekends " आम्ही कवितांसोबत घालवलेले आहेत. "सुवर्ण नौका" अणि "सौंदर्य कुंज" असे कधी काळी आई-बाबांना (बहुदा) कुठल्यातरी वाचनालयात मिळालेले दोन काव्य संग्रह आमच्यापाशी होते. त्यातल्या कविता बाबा आम्हा सगळ्यांना वाचून दाखवायचे . सहसा जेवणं उरकल्यावर आमची ही मैफिल रंगे. बाबांचा काव्यप्रवास कुठून सुरु झाला नाही ठाऊक पण बाबा कविता फार सुंदर वाचतात . वाचतात काय, बाबा कविता जिवंत करतात . त्यामुळेच हिरव्या गालिछावर डोलणारी फुलराणी मीच आहे , आणि "छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे ग पहात होती " म्हणत तिला चिडवणारा वारा म्हणजे बाबाच आहेत असे नेहमी वाटायचे. बाबांनी उभा केलेला , मर्ढेकरांचा "गणपत वाणी " माझ्या भावाला आणि मला खूपच आवडायचा . ती कविता आम्ही बाबांकडून अनेकदा वाचून घ्यायचो. बालकवींच्या संगे आम्ही दूर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या पिट...
n life as i walk on em