Skip to main content

Posts

Showing posts with the label marathi
डोळ्यांपुढे दाटल्या आज पुन्हा सावल्या पहिल्या वहिल्या व्हॅलंटाईनच्या काही खुणा ओल्या न्हाऊन निघाले त्यानंतरही कित्येकदा जरी चिंब मनाला आज हि भिजवती त्याच हळव्या सरी
कधी फूलवावे मनीचे फुलोरे कधी आठवावे पुन्हा त्या क्षणांना जरा धुंद व्हावे ही धुंदी कशाची कळे ना तुला न कळे या जगाला कधी गीत व्हावे चुकल्या रवांचे कधी ताल द्यावे मनीच्या स्वरांना पुन्हा रंगवावे ती ओली नीशाणी जरा सुख द्यावे नीळ्या लोचनांना अरे तू तसा मी अशी भाववेडी कुणी ते टीपावे मुक्या भावनांना स्वये ओढृनी काळी रात्रीची चादर पुन्हा नीजवावे वेड्या मनाला
कागदांच्या फुलान्मध्ये गुलाबाचा गंध शोधते मी उघड्या वाळवंटात पाण्याचा थेंब शोधते मी तुझ्या नसण्याचा अर्थ शोधते मी माझ्या जगण्याचा अर्थ शोधते मी ****************************************** थरथरत्या पापण्यांमध्ये हलके हलके दव्बिन्दू वीरक्त मनाच्या ओलाव्याची एकच अपूर्ण खूण ******************************************* जीत माझी नसली तरी तुझी तरी कुठे आहे डोळ्यांमधून ओघळायला प्रीत तरी कुठे आहे ********************************************* हलक्या पावलांनी तू कधी उतरलीस माझ्या मनी सांग कशा साठवू तुझ्या नाजुक पाउलखुणा

चारोळ्या

आयुष्याचे गूढ़ मला कळो ना कळो आयुष्य मला कळलंय खडतर वाटेवर सोबतीला तुझ्या सावलीला मी धरलय ___________________________ भरुनी वाह्ताना रीतेपन अनोखे वसंतात पुन्हा का वादळाचे झोके ? _________________________ सारे शब्द तुला देऊन मुके मुके माझे जीणे अवघेच गिणत चुक्ल्यावर काय अधीक काय उणे ?

गारवा

एक उनाड़ काळा ढग उगाच वेडा धावत असतो आसुसलेल्या मनांमध्ये स्वप्न नवे जागवत असतो हीरवे तृण आभाळ पाहून क्षणभर सरसर शहारते रान पाखरू भान हरपून वार्यासंगे लहरते पाना - फुलां - झाङांमध्ये एक अभीनव ताज्वा भरतो पाउस सरला तरी मनाला हाच गारवा हवा वाटतो

शब्दावीना कळावे

शब्दावीना कळावे , मी सांगणार नाही स्वर साधना पुन्हा ती मी साधणार नाही समजे तुला कधी रे , अशब्द प्रीत वाणी डोळ्यांतुनी पहावे , उमजे तुला कहाणी सारे जरी तुझे रे हे शब्द फ़क्त माझे हळुवार भावनांचे ओठांवरील ओझे शब्दावीना कळावे , मी सांगणार नाही शब्दात प्रीत पुन्हा मी बांध्नार नाही