Skip to main content

काव्यरस

"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ,
क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे "
माझा कवितांसोबातच्या आठवणींचा प्रवास इथून सुरु होतो. बालपणीचे कित्येक " Family weekends " आम्ही कवितांसोबत घालवलेले आहेत. "सुवर्ण नौका" अणि "सौंदर्य कुंज" असे  कधी काळी आई-बाबांना (बहुदा) कुठल्यातरी वाचनालयात मिळालेले दोन काव्य संग्रह आमच्यापाशी होते. त्यातल्या कविता बाबा आम्हा सगळ्यांना वाचून दाखवायचे . सहसा जेवणं उरकल्यावर आमची ही मैफिल रंगे. बाबांचा काव्यप्रवास कुठून सुरु झाला नाही ठाऊक पण बाबा कविता फार सुंदर वाचतात . वाचतात काय, बाबा कविता जिवंत करतात . त्यामुळेच हिरव्या गालिछावर डोलणारी फुलराणी मीच आहे , आणि
"छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे ग पहात होती "
म्हणत तिला चिडवणारा वारा म्हणजे बाबाच आहेत असे नेहमी वाटायचे.  बाबांनी  उभा केलेला , मर्ढेकरांचा "गणपत वाणी " माझ्या भावाला आणि मला खूपच आवडायचा . ती कविता आम्ही बाबांकडून अनेकदा वाचून घ्यायचो. बालकवींच्या संगे आम्ही  दूर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या पिटुकल्या गावी पोहोचायचो आणि बोरकरांच्या कवितांमधून घर बसल्या गोव्याची सैर व्हायची.  केशवसुतांसोबत सतारीचे बोल ऐकत फिरताना बाबा गंभीर व्हायचे , पण मला मात्र सतारीचे बोल "दीड दा  दीड दा  " कसे वाजतात असा प्रश्न पडायचा (ज्याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही ) .

कविता ऐकत ऐकत आम्ही सारेच लय जुळवून बाबांसोबत कविता म्हणायचो .
"काठोकाठ भरू द्या पेला , फेस भराभर  उसळू द्या "
असे  एका सुरात म्हणताना खरोखर स्फूर्ती यायची . आम्ही कविता पाठ करायचो आणि मग सगळीकडे कविताच दिसायची . पूर्वेकडे (अथवा पश्चिमेकडे ) गुलाबी छटा दिसल्या की ,
"कुणी बांधिला गुलाबी फेटा , झगमगणारा सुंदर मोठा "
असा प्रश्न मनी येतो, पाण्यावर झाडाची सावली दिसल्यावर ,
"झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवर "
असे वाटते , आणि पावसाळ्यात नेहमीच "गडद निळे गडद निळे जलद भरून "येतात.

आमच्याकडे पाडगावकरांच्या बडबडगीतांची काही पुस्तके होती . ती वाचल्यावर "कविता" हा फारच सोपा प्रकार आहे असे वाटायचे . मग पाडगावकर "बाबागाडी खरं म्हणजे बाबांसाठी " असं म्हणायचे तर आम्ही (म्हणजे मी आणि माझा भाऊ ),
"डब्यात आहेत लाडू , वाटतं कधी एकदा काढू "
असं यमक जुळवायचो .
अशाच बडबडकवितांची एक वही होती माझी . (ती आईने अजूनही जपून ठेवली असावी). आमच्या शाळेत गिरीजा मुरगोडी नावाच्या मराठीच्या शिक्षिका होत्या . त्यांनी कविता लिहायला आणि वाचायला खूप प्रोत्साहन दिले . "आजीचे घड्याळ " अशी एक कविता त्यांनी मला दिली होती . ती कविता मनात इतकी रुजली आहे की  "आजी" म्हणताच, माझी आजी जरी डोळ्यासमोर नाही आली, तरी बिन-घड्याळाची ती 'कवितेतली आजी' नेहमीच डोळ्यासमोर येते.

हायर  सेकण्डरी मध्ये पोहोचल्यावर मराठी कविता मागे पडल्या आणी हिंदी कविता आवडू लागल्या . त्यात ही गझल हा तर एकदम आवडीचा प्रकार होता . प्रेमात पडल्यावर
"प्यार का पहला खत लिखने , वक्त तो लगता है "
याचा प्रत्यय आला आणि प्रेमातून बाहेर पडल्यावर
"तेरे खुशबू में बसे खत , मै जलाता कैसे ?" असं  होऊन गेलं . आजही दूर गेलेले मित्र आठवले , की गुलजार कानात कुजबुजतात ,
"हाथ छूटे तो भी रिश्ते नही  छुटा करते
वक्त कि शाख से लम्हे नही टूटां करते "

इन्जीन्यीरिंग मध्ये प्रवेश घेतल्यावर इंटरनेटवर  "e e cummings " आणि "Pablo Neruda " भेटले. मग यमक नसलेल्या इंग्रजी कविता भावू लागल्या . "one's not half two , it's two are halves of one" ह्या cummings च्या ओळींमध्ये कित्येकदा हरवले आहे मी. Neruda च्या 'प्रेम कविता' वाचल्यावर, केवळ ती  कविता कुणाला तरी उद्देषून वाचता यावी, म्हणून तरी एकदा तसे वेडे प्रेम व्हावे आणि प्रेमभंग व्हावा असे वाटून जाते . गळलेली नाती आणि हरवलेले मित्र डोक्यात कल्लोळ करतात तेव्हा
"The art of losing isn't hard to master,
though it may seem like, write it, disaster."
ह्या ओळीं मनाची समजूत काढतात.

शब्द अपुरे पडल्यावर मनातली ओझी उतरावयाला कविता नेहमीच मदतीस आल्या आहेत. कधी कधी आपल्याला जे वाटत असते ते आपल्यालाच उमगत नसते , मग अशावेळी एक कविता भेटते आणि भावनांना बोलकं करते. एकीकडे अगाध शब्दभांडार असूनही आपण शब्दांना गवसण्यासाठी धडपडत असतो , आणि त्याउलट हे  कवी मोजक्याच शब्दात कित्येक गूढ कल्पनांना कवितेत बांधतात ह्याचे नेहमीच मला कुतूहल वाटत आले आहे. कवितेच्या आडून मी कित्येकदा मनातली घालमेल जगापुढे ओतली आहे आणि आनंद ओसंडून वाहताना कवितेमागे हळूच त्याला सावरले आहे. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटलेल्या कवितेला आणि त्या कविता रचणाऱ्या कवींना ही भावांजली.

Comments

Popular posts from this blog

अजुन माझे चुकले - माकले शब्द तुला टोचत असतील सावलीमध्ये कधी चुकून क्षण ओले भिजवत असतील पाउस म्हणून , वेड्या मनाची समजूत ही , तू घालत असशील मी नसले तरी कधी , चोरून, स्वप्न माझी पाहत असशील नसेन मी , पण हरवलेली प्रीत माझी खरी आहे एक डाव फसला , म्हणून आयुष्यभराची दूरी आहे

Trade-off

Trade-offs. used this term a couple o times couple o places. Dint think i d b using it in lifE as such. There's always a trade-off , between what's in your hand at right now, and what u wanna hold. Between what u can do, and what u wanna do. Between ur heart and ur head. Should there be? if we are a single entity, should what we feel be different from what we live? shouldn't life be bound by one philosophy, a single thought that runs through you, and reflects in everything that you do? Should there be a trade-off between being happy and making someone happy? Shouldn't it be the same? i can't understand compromises. I cant understand giving up something for something else. There cant be something less and something more... its either something o nothing. i cant understand why we sometimes fake ourselves. or we drift to believe that we are something else. why is inactivity so elusive? What can be achieved from endless conversations tat lead nowhere, head nowhere? Why ...

friends, dreams, twilight n stuff

last week been totally busy... ma roomie frm pune had come down. so been roaming around for like a week. day one was north goa -- panjim , anjuna .. etc.began with dona paula , then kala academy , panjim church, lunch at aunty maria, my first visit to the flea market. shopped like an idiot, then went to aguada .. click click. day two went kart racing, then colva , jet ski, then ccd , coffee n craziness... day 3 was in coll, n then old goa n monte , day 4 -- jus in n ard vasco -- japanese garden, three kings. all awesome times. was like being back in pune ! all crazy shit talk, swinging, bitching, laughing, more like rolling on floor. sittin up late nights ( nt smtin new). twas funn ... got lots of time on the wheel. driving is addictive. u want more n more of it! day b4 morning, she went back,dropped her to panjim . the bridge was closed, so had to go all the way via ponda ! :P rest of the day was spent wit friends ! caught up wit a friend after some 5 long years. end of ...