Skip to main content

गारवा

एक उनाड़ काळा ढग उगाच वेडा धावत असतो
आसुसलेल्या मनांमध्ये स्वप्न नवे जागवत असतो

हीरवे तृण आभाळ पाहून क्षणभर सरसर शहारते
रानपाखरू भान हरपून वार्यासंगे लहरते

पाना- फुलां-झाङांमध्ये एक अभीनव ताज्वा भरतो
पाउस सरला तरी मनाला हाच गारवा हवा वाटतो

Comments